लोणी काळभोर :- मायफेअर एलेगान्झा फेज–२ च्या वतीने कोंढवा येथे मीना बाजार २०२६ या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पुणे शहर अध्यक्षा हसीना इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी हुसनेरा मॅडम तसेच मायफेअर कमिटीचे सर्व मान्यवर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
“सदर कार्यक्रम हा अतिशय रंगतदार व उत्साहापुर्वक आहे. महिलांच्या उद्यमशीलतेला चालना देणारा, स्थानिक व्यावसायिकांना एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि कुटुंबीयांसाठी आनंददायी अनुभव देणारा असा हा मीना बाजार निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे.” अशा भावना याप्रसंगी हसीना इनामदार यांनी व्यक्त केल्या.
*संपादक- अमोल अडागळे*
*सहसंपादक – रियाज शेख*
Views: 229









