लोणी काळभोर :
उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांच्यावर राज्य महिला आघाडीची धुरा
रेशन दुकानदारांच्या हक्कांसाठी आता हेमलता बडेकर मैदानात; राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड
रेशन धान्य दुकानदारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या ‘अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे’च्या राज्य महिला आघाडीच्या प्रमुखपदी उरुळी कांचन येथील श्रीमती हेमलता बाळासाहेब बडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मेमाणे फार्म या ठिकाणी आयोजित महाराष्ट्र राज्य कार्यकारणी, सर्व जिल्हाध्यक्ष व रेशन दुकानदारांच्या संयुक्त बैठकीत महासंघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली
दुकानदारांना केले. या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष काका देशमुख, प्रदेशाध्यक्ष डी. एन. पाटील, उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, सचिव चंद्रकांत यादव, हवेली तालुका सचिव महेंद्र सरोदे आदी उपस्थित होते. या वेळी हेमलता बडेकर यांची राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दुकानदार उपस्थित होते.
या निवडीबद्दल उरुळी कांचनसह हवेली तालुक्यातील रेशन दुकानदार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना आणि ग्रामस्थांकडून हेमलता बडेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








