लोणी काळभोर (प्रतिनिधी):-लोणी काळभोर येथील जिजाऊ गार्डन येथे अँबिशन क्लासेस चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा हा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोमवार दिनांक २६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विशे कंपोनेंट कंपनीचे एच. आर. मॅनेजर प्रमोद होरे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता होरे या होत्या. त्याचबरोबर श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, लोणी काळभोरच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे , सामाजिक कार्यकर्ते कैलास वलठे , सुप्रसिद्ध नृत्य कलाकार सुयश सूर्यवंशी, इतर मान्यवर शिक्षक, पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन , स्वागतगीत व राष्ट्र गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये, नाट्यछटा, समूहगीत व एकांकिका यांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठीच मनोरंजक ठरला. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अँबिशन एज्युकेशन फाउंडेशन च्या अध्यक्षा (संचालिका) प्राजक्ता शंकर भुजबळ, संस्थेचे सचिव सिद्धार्थ येवतीकर , सहशिक्षिका भाग्यश्री सिद्धार्थ येवतीकर, सहशिक्षिका अंजली कांबळे, बलभीम श्रीरामे, माधव निलेवाड, रणजित शिंदे , ऋषी तांदळे , शिक्षकवृंद, यांनी केले.
संपादक – अमोल अडागळे, रियाज शेख









