पत्रकार दिन व पोलीस स्थापना दिनानिमित्त लोणी काळभोर येथे पोलीस व पत्रकारांमध्ये क्रिकेट सामना पार पडला


महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त २ जानेवारी ते ८ जानेवारी असा विविध कार्यक्रम आयोजित केले जात असुन ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणुन साजरा केला जाते त्याचे औचित साधून लोणी काळभोर पोलीस स्टेशन व पंचक्रोशीतील पत्रकार यांचा एमआयटीतील मैदानात मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी दुपारी सामना रंगला.

सदरच्या सामन्याचे उद्घाटन परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित पत्रकार यांना पत्रकार दिनानिमित्त गुलाब पुष्प देवुन शुभेच्छा देण्यात आल्या. सदर वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सपोनि बाबर, पोउपनिरी सोनटक्के, बिराजदार व अंमलदार उपस्थित होते.

प्रथम नाणेफेक जिकुंन लोणी काळभोर पोलीस संघाने प्रथम फलदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या धावसंख्येला प्रतिउत्तर देताना पत्रकार संघाकडुन कडवी झुंज देण्यात आली. सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच योगेश उदमले यांना देण्यात आली. या सामन्यासाठी हवेली डॉक्टर असोसियशन व अध्यक्ष राहुल काळभोर व डॉ. रतन काळभोर यांचे कडुन मोलाचे सहकार्य लाभले

 

*संपादक :- अमोल अडागळे*

*सहसंपादक :- रियाज शेख*


2
कृपया वोट करा

राष्ट्रीय वार्ताच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!